Google Search Bar for Instagram Story by Chetan Hajare
Posts
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज Rashtra Sant Tukdoji Maharaj.
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. Rashtra Sant Tukdoji Maharaj. राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे तुकडोजी महाराज यांची आज जयंती. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेल्या यावली शहीद या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पूजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे कीर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरूमहाराजांनी त्यांना 'तुकड्या' म्हणून हाक मारली. 'तुकड्या म्हणे', असे म्हणत जा, असे सांगितले. 'तुकड्या म्हणे' या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले.Rashtra Sant Tukdoji Maharaj. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी ...
झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई
- Get link
- X
- Other Apps
झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई Rani of Jhansi वाराणसीचे मोरोपंत तांबे यांची कन्या मनू उर्फ मणीकर्णिका हिचा जन्म,, १९नोव्हेंबर १८३५ साली झाला होता. मनूला लहान पणा पासूनच घोड्यावर बसणे, तलवार चालवणे आणि राजकीय घडामोडीमध्ये स्वारस्य होते. त्यांचा विवाह श्रीमंत गंगाधर राव नेवाळकर यांच्याशी झाला होता. त्यानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले होते. दामोदरपंतच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले होते. त्यांनी इंग्रजी सत्तविरुद्ध बंड पुकारला होता तसेच श्रीमंत नानासाहेब पेशवे, सरदार तात्या टोपे इत्यादी स्वंतत्र सेनानीबरोबर स्वांतत्र संग्रामात भाग घेतला होता. त्यातच १८ जून १८५८रोजी त्यांचा मृत्यू झाला. असे अनेक प्रसंग मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहो.